गूगलच्या 'Find My Device' चं रंगरूप बदललं! आता नवीन नाव आणि फीचर्ससह करणार एंट्री; या नावाने ओळखली जाणार सर्विस
टेक जायंट कंपनी गुगलच्या अनेक सर्विस युजर्समध्ये लोकप्रिय आहे. यातीलच एक लोकप्रिय सर्विस म्हणजे Find My Device. गुगलच्या या सर्विसचं रंगरूप आता बदललं आहे. कंपनीने त्यांची जुनी सर्विस आता एका अपडेटेड वर्जनमध्ये सादर केली आहे. यावेळी कंपनीने या Find My Device सर्विसचं केवळ फीचर नाही तर नाव देखील बदललं आहे. आता गुगलची लोकप्रिय Find My Device ही “Find Hub” नावने ओळखली जाणार आहे. Android Show ईव्हेंटदरम्यान कंपनीने ही मोठी घोषणा केली आहे. आता ही सर्विस पूर्वीपेक्षा जास्त शक्तिशाली आणि व्यापक होणार आहे. त्यामुळे युजर्सना आता या सर्विसमध्ये अधिक चांगला अनुभव मिळणार आहे.
1.45-इंच AMOLED डिस्प्लेसह लाँच झाले नवीन स्मार्टवॉच, 7 दिवस चालणार बॅटरी! जाणून घ्या किंमत
गूगलची ही सेवा, यापूर्वी केवळ हरवलेले अँड्रॉईड डिव्हाईस शोधण्यासाठी वापरली जात होती. मात्र आता यामध्ये नावासह अनेक बदल करण्यात आले आहेत. आता ही सर्विस अँड्रॉईड डिव्हाईससोबतच इतरही अनेक आयटम्स शोधण्यासाठी युजर्सची मदत करणार आहे. आता ही सर्विस इतर आयटम्य देखील ट्रॅक करू शकणार आहे. यामध्ये सॅटेलाइटच्या मदतीने लोकेशन ट्रॅकिंग, नवीन ब्लूटूथ टॅग्स, आणि अनेक एयरलाइन कंपन्यांसोबत भागीदारी करून नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य – X)
सुरुवातीला हे फीचर Apple च्या Find My चा एक अँड्रॉइड पर्याय होता. मात्र गेल्यावर्षी या सर्विसमध्ये मोठा बदल करण्यात आला, जेव्हा गूगलने एक crowdsourced नेटवर्क सुरु केला. हा नेटवर्क Chipolo आणि Pebblebee सारख्या थर्ड पार्टी ब्लूटूथ ट्रॅकर्सच्या मदतीने पर्सनल आयटम्स शोधण्याची सुविधा देतो.
Find My Device is becoming Find Hub — and we’re making it even easier to locate your belongings, family and friends. Later this year, Find Hub will get satellite connectivity to help you stay connected even when you lose cellular service. https://t.co/f0xUS8q36M
— News from Google (@NewsFromGoogle) May 13, 2025
आता गूगलने या सर्विसमध्ये त्यांच्या अनेक पार्टनर्सना सहभागी केलं आहे, ज्यांच्या डिव्हाईसमध्ये आधीपासूनच लोकेशन ट्रॅकिंगची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये July आणि Mokobara सारख्या लगेज ब्रँडचा देखील समावेश आहे, ज्यामध्ये सामान अगदी सहजपणे ट्रॅक केले जाऊ शकते. Peak इंटीग्रेशनसह स्की सारख्या वस्तू देखील अगदी सहजपणे ट्रॅक केल्या जाऊ शकतात. लहान मुलं आणि फॅमिलीसाठी Pixbee चे नवीन ब्लूटूथ टॅग्स देखील या सिस्टमसह जोडले जाणार आहेत. या महिन्याच्या अखेरीस, युजर्स अल्ट्रा-वाइडबँड (UWB) तंत्रज्ञानाचा वापर करून मोटोरोलाचे मोटो टॅग शोधू शकतील.
गूगलने हे देखील सांगितलं आहे की, सॅटेलाइट-आधारित ट्रॅकिंग सपोर्ट सर्विस या वर्षाच्या अखेरपर्यंत लाँच केली जाऊ शकते. यामुळे मोबाईल नेटवर्क किंवा इंटरनेट उपलब्ध नसलेल्या ठिकाणीही हरवलेली डिव्हाईस शोधण्यासाठी मदत होणार आहे.
गूगलने अनेक अंतरराष्ट्रीय एयरलाइंससह देखील पार्टनरशिपची घोषणा केली आहे. ही भागिदारी Apple च्या Find My च्या एयरलाइन इंटीग्रेशन नंतर सुरु झाली आहे. गूगलसह जोडल्या जाणाऱ्या एयरलाइंसमध्ये Aer Lingus, British Airways, Cathay Pacific, Iberia, आणि Singapore Airlines यांचा समावेश असणार आहे.