WhatsApp युजर्सची मजा! आता स्टेटसला 1 मिनिटांहून अधिकचा व्हिडीओही करता येणार शेअर, लवकरच येणार नवीन अपडेट
जगभरातील लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp त्यांच्या युजर्ससाठी नेहमीच नवीन फीचर्स रिलीज करत असते. काही फीचर्स तर इतके मजेदार असतात की त्यामुळे युजर्सची कामं अगदी सहज पूर्ण होतात. आता देखील कंपनी त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन फीचर रिलीज करण्याच्या तयारीत हे फीचर WhatsApp स्टेटस संबंधित आहे. कंपनी त्यांच्या युजर्ससाठी एक खास गिफ्ट घेऊन आली आहे. आतपर्यंत युजर्स त्यांच्या WhatsApp स्टेटसवर 60 सेकंदापर्यंत म्हणजेच 1 मिनिटांचा व्हिडीओ शेअर करू शकत होते. मात्र आता कंपनीने या फीचरमध्ये अपडेट केलं असून आता युजर्स त्यांच्या स्टेटसवर 1 मिनिटांहून मोठा व्हिडीओ देखील अपलोड करू शकणार आहेत.
Samsung One UI 7 च्या रिलीजबाबत समोर आली मोठी अपडेट! युजर्सची वाढली चिंता, X पोस्ट व्हायरल
टेक कंपनी मेटाने WhatsApp स्टेटसवर शेअर केल्या जाणाऱ्या व्हिडीओची मर्यादा 60 सेकंदांवरून 90 सेकंदांपर्यंत वाढवली आहे. WhatsApp ने एक मोठे अपडेट आणले आहे, आता तुम्ही फक्त 60 सेकंदांऐवजी 90 सेकंद लांबीचा व्हिडीओ तुमच्या स्टेटसवर शेअर करू शकणार आहात. कंपनी WhatsApp स्टेटससाठी एक नवीन अपडेट आणत आहे. हे अपडेट युजर्ससाठी अत्यंत फायदाचं ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
WhatsApp लवकरच त्यांच्या स्टेटस फीचरची व्हिडिओ मर्यादा 90 सेकंदांपर्यंत वाढवणार आहे. पूर्वी तुम्ही एका वेळी फक्त 60 सेकंदापर्यंतचा व्हिडिओ अपलोड करू शकत होता, आता ही मर्यादा 30 सेकंदांनी वाढवण्यात आली आहे. ज्या युजर्सना नवीन त्यांच्या WhatsApp स्टेटसवर मोठे व्हिडीओ शेअर करायला आवडतात, त्यांच्यासाठी हे नवीन अपडेट फायद्याचं ठरणार आहे.
सध्या हे फीचर फक्त WhatsApp च्या बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे सध्या हे फीचर काही निवडक युजर्ससाठीच रिलीज करण्यात आलं आहे. लवकरच हे फीचर सर्व युजर्ससाठी जारी केलं जाणार आहे. जर तुम्ही बीटा युजर असाल, तर तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून हे व्हर्जन अपडेट करून नवीन फीचर वापरू शकता.
आजकाल, लोक लहान व्हिडिओ क्लिप्सऐवजी पूर्ण आणि सतत व्हिडिओ शेअर करणे पसंत करतात. अशा परिस्थितीत, 90 सेकंदांपर्यंतचा व्हिडिओ थेट स्टेटसवर पोस्ट करता येणार असल्याने वेळ तर वाचेलच, शिवाय स्टोरी अधिक प्रभावी आणि सहजतेने शेअर करता येईल.