Android यूजर्स सावधान! या स्मार्टफोन्सवर लवकरच बंद होणार WhatsApp! आत्ताच करा हे काम
टेक मार्केट तापले! पावरफुल प्रोसेसरसह नवा Vivo 5G लाँच, फीचर्स आणि किंमत जाणून घ्या
मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप सतत नवीन फीचर्स आणि अपडेट्स रोलआऊट करत असते. या फीचर्स आणि अपडेट्समुळे यूजर्सचा व्हॉट्सअॅप वापरण्याचा अनुभव अधिक चांगला व्हावा असं कंपनीचं उदिष्ट असतं. पण नवीन फीचर्ससोबतच चांगल्या परफॉर्मंससाठी अॅप अपडेट ठेवणं देखील तितकंच महत्त्वांचं असतं. कारण अँड्रॉइडचे जुने वर्जन आणि कमकुवत हार्डवेअर यांमुळे हे नवीन फीचर्स व्यवस्थित चालवणे अवघड होऊ शकते. याच कारणामुळे आता कंपनीने थेट जुन्या अँड्रॉईड वर्जनवर व्हॉट्सअॅप सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, भारत, ब्राजील, पाकिस्तान आणि अनेक आशियाई आणि आफ्रीरेतील देशांमध्ये आजही मोठ्या संख्येने यूजर्स जुन्या अँड्रॉईड स्मार्टफोनचा वापर करत आहेत. अशा परिस्थितीत कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा लाखो यूजर्सवर परिणाम होऊ शकतो.
मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपने आधीच यूजर्सना अलर्ट पाठवण्यास सुरुवात केली आहे. व्हॉट्सअॅप ओपन करताच यूजर्सना एक नोटिफिकेशन पाहायला मिळते. यामध्ये सांगितलं जातं आहे की, 8 सप्टेंबर 2026 नंतर ही सर्विस बंद होणार आहे.
जर तुम्ही वापरत असलेल्या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड 6.0 किंवा त्यावरील वर्जन इंस्टॉल असेल, चिंता करण्याची गरज नाही. कारण कंपनीच्या निर्णयाचा तुमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही आणि तुमच्या फोनमधील व्हॉट्सअॅप पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार आहे. तसेच आयफोन आणि आयपॅड यूजर्सवर देखील कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा कोणताही परिणाम होणार नाही.
जर तुम्ही अँड्रॉईड 5.0 किंवा 5.1 वर चालणारा स्मार्टफोन वापरत असाल तर त्वरित अपडेट करा. तुमच्या फोनवर अपडेट उपलब्ध नसल्यास, नवीन स्मार्टफोन खरेदी करणे हाच एकमेव पर्याय आहे. तसेच, तुमचे सर्व चॅट्स सुरक्षित राहतील याची खात्री करण्यासाठी, आताच त्यांचा बॅकअप घ्या.






