(फोटो सौजन्य: Pinterest)
यूजरचा अनुभव अधिकाधिक चांगला करण्यासाठी कंपनी नवनवीन फिचर घेऊन येत आहे. मागेच कंपनीने स्टेटसमध्ये म्यूजिक ॲड करण्याचे फिचर आणले होते ज्याचा वापर यूजर्स मोठ्या प्रमाणात करत आहेत. तुम्ही व्हाट्सॲप स्टेटसचा वापर करत असल्यास यात एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल की स्टेटसला जेव्हा आपण कॅप्शन देतो आणि पोस्ट करतो त्यानंतर या कॅप्शनमध्ये आपल्याला काहीच बदल करता येत नाही, म्हणजेच आपल्याकडून जर कॅप्शनमध्ये काही चुका झाल्या तर त्या आपल्यायाला दुरुस्त करता येत नाही. यामुळे चुक लक्षात आल्यांनतर पोस्ट केलेला व्हाट्सॲप स्टेटस यूजर्सनाडिलीट करुन पुन्हा पोस्ट करायला लागायचा. हिच गोष्ट लक्षात घेत कंपनीने आता यूजरच्या कामाचे नवीन फिचर लाँच केले आहे.
व्हॉट्सॲपच्या नवीन फीचर्सचा मागोवा घेणाऱ्या WaBetaInfo या वेबसाइटच्या अहवालानुसार, व्हाट्सॲपची पॅरंट कंपनी एका अशा नव्या फिचरवर काम करत आहे ज्याच्या मदतीने यूजर स्टेटस पोस्ट केल्यानंतरही त्याला एडिट करु शकणार आहेत. माहितीनुसार, हे नवीन फिचर सध्या व्हाट्सॲपच्या बीटा व्हर्जनवर दिसून येत आहे आणि यावर अद्याप काम सुरु आहे. जर हे फिचर लाँच करण्यात आले तर यूजर्सना कॅप्शनमधील आपल्या लहान चुकांसाठी पूर्ण स्टेटस डिलीट करण्याची गरज लागणार नाही.
एडिट करता येणार व्हॉट्सॲप स्टेटस
नवे फिचर अद्याप सर्व यूजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले नसून लवकरच यूजर्सना या फिचरचा लाभ घेता येणार आहे. सध्या यूजर्सना व्हॉट्सॲप स्टेटस अपलोड केल्यानंतर याच्या कॅप्शनमध्ये बदल करता येत नाहीये. पण काही दिवसांनंतर यूजर्सना स्टेटस पोस्ट केल्यानंतरही कॅप्शनमध्ये बदल करण्याची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. बीटा व्हर्जनमधून समोर आलेल्या माहितीनुसार, यूजर स्टेटस अपलोड केल्याच्या १५ मिनिटांपर्यंत पोस्ट केलेल्या कॅप्शनमध्ये बदल करुन त्याला एडिट करु शकणार आहेत. अशात जर काही स्पेलिंग मिस्टेक असतील किंवा नवे चांगले कॅप्शन द्यायचे असेल किंवा त्यात आणखी काही मजकूर ॲड करायचा असेल तर ते तुम्हाला स्टेटस डिलिट न करताच एडिट करुन यात आवश्यक ते बदल करता येणार आहेत.






