MWC 2025: आतापर्यंत ईव्हेंटमध्ये काय घडलं? कोणते गॅझेट्स झाले लाँच? जाणून सर्व काही एका क्लिकवर
बार्सिलोना येथे 3 मार्चपासून मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) 2025 चे आयोजन करण्यात आले होते. हा तीन दिवसांचा ईव्हेंट 6 मार्च रोजी संपन्न झाला. या ईव्हेंटमध्ये अनेक टेक कंपन्यांनी त्यांचे अद्भुत गॅझेट्स लाँच केले आहेत. तर काहींनी आगामी गॅझेटची संकल्पना सादर केली. या ईव्हेंमध्ये आतापर्यंत शाओमी 15 अल्ट्रा, लेनोवो योगा सोलर पीसी, एचएमडी फ्यूजन एक्स 1, इनफिनिक्स का ट्रिपल-फोल्डेबल फोन, Google Gemini AI सह इतर प्रोडक्ट्स सादर करण्यात आले आहेत. यातील काही प्रोडक्ट्सबद्दल जाणून घेऊया.
Xiaomi ने MWC 2025 मध्ये त्यांचा नवीनतम फ्लॅगशिप Xiaomi 15 Ultra सादर केला आहे. हा एक कॅमेरा फोकस्ड डिवाइस आहे. यामध्ये स्नॅपड्रॅनग 8 एलिट प्रोसेसर, 1-इंच टाइप मेन सेंसर, 200 एमपी टेलीफोटो लेंस आणि अल्ट्रा-वाइड एंगल कॅमेरा आहे, जो अद्भुत फोटोग्राफी करू शकतो. हे नवीन डिव्हाइस Xiaomi Hyper OS 2 वर आधारित आहे, जे Android 15 सह येते. Xiaomi 15 चा बेस व्हेरिअंट देखील लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)
एचएमडी ग्लोबलने फॅमिली सेंट्रिक स्मार्टफोन एचएमडी फ्यूजन एक्स लाँच केला आहे. हा स्मार्टफोन विशेषत: लहान मुलांसाठी डिझाईन करण्यात आला आहे. यात मजबूत पॅरेंटल कंट्रोल फीचर्स आहेत. एचएमडीने एचएमडी 130, एचएमडी 150 म्युझिक आणि एचएमडी 2660 मॉडेल्स देखील लाँच केले आहेत. कंपनीने अँपेड बड्स नावाचे वायरलेस इअरबड्स देखील लाँच केले आहेत. हे केस मॅगसेफ सारख्या मॅग्नेटिक अटॅचमेंटद्वारे इअरबड्ससह तुमचा स्मार्टफोन वायरलेसपणे चार्ज करू शकते.
लेनोवोने योगा सोलर पीसी नावाचा सौरऊर्जेवर चालणारा लॅपटॉप या ईव्हेंटमध्ये सादर केला आहे. स्क्रीनवर बसवलेल्या सोलर पॅनेलद्वारे हा लॅपटॉप चार्ज करता येतो. लेनोवोने सध्या हा लॅपटॉप एक कांसेप्ट डिवाइस म्हणून सादर केला आहे, परंतु कंपनी भविष्यात हा लॅपटॉप बाजारात आणण्याचा विचार करू शकते. लेनोवोने थिंकबुक फ्लिप देखील सादर केला आहे, ज्यामध्ये 18.1-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले आहे जो 13.1-इंचाच्या लॅपटॉप मोडमध्ये आणि 12.9-इंचाच्या टॅबलेट मोडमध्ये रूपांतरित होऊ शकतो. हे इंटेल कोल अल्ट्रा 7 प्रोसेसर, 32 जीबी रॅम आणि 1 टीबी स्टोरेजसह येते.
इन्फिनिक्सने MWC 2025 मध्ये झिरो सिरीज मिनी नावाच्या ट्रिपल-फोल्डेबल स्मार्टफोनची संकल्पना सादर केली आहे . यात ड्युअल-हिंग आणि ट्रिपल-फोल्डिंग यंत्रणा आहे, ज्यामुळे ते अनेक वेगवेगळ्या मोडमध्ये वापरता येते. इन्फिनिक्सने ने-कलर शिफ्ट 2.0 टेक्नोलाजी देखील सादर केले आहे, जे युजर्सना फोनच्या मागील पॅनलचा रंग बदलण्याची परवानगी देते, ज्यामध्ये 30 वेगवेगळ्या रंगांच्या स्टाइल्सचा समावेश आहे.
गुगल जेमिनी अॅडव्हान्स्ड सबस्क्राइबर्ससाठी स्क्रीन-शेअरिंग आणि लाईव्ह व्हिडिओ फीचर आणत आहे. या महिन्याच्या अखेरीस ही वैशिष्ट्ये अँड्रॉइड डिव्हाइसवर उपलब्ध होतील. प्रोजेक्ट अॅस्ट्राअंतर्गत, गुगल जेमिनी विकसित करत आहे, जे युजर्सना स्क्रीनवर प्रदर्शित होणाऱ्या कंटेंटबद्दल प्रश्न विचारण्याची परवानगी देईल आणि AI त्यांची उत्तरे देईल.
शाओमीने चीनमध्ये त्यांची पहिली इलेक्ट्रिक कार SU7 अल्ट्रा लाँच केली आहे. त्याची किंमत सुमारे 60 लाख रुपये आहे आणि ती फक्त दोन सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते.