Android 16 वर आधारित HyperOS 3 अखेर लाँच! Xiaomi, Poco आणि Redmi च्या या डिव्हाईसना मिळणार अपडेट
चायनीज स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने त्यांचे लेटेस्ट सॉफ्टवेयर HyperOS 3 अखेर लाँच केले आहे. कंपनीचे हे ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉयड 16 वर आधारित आहे. स्मार्टफोन मेकर कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया मीडिया अकाऊंटवरून या सॉफ्टवेयर अपडेटचा ग्लोबल रिलीज टाइम लाइन शेयर केला आहे. असं सांगितलं जात आहे की, या नवीन अपडेटमध्ये अनेक नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे हे नवीन अपडेट वापरताना युजर्सना अधिक चांगला अनुभव येणार आहे. पण हे स्मार्टफोन कोणत्या स्मार्टफोन्सना मिळणार माहिती आहे का? आता आम्ही तुम्हाला अशा स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत, ज्यांना शाओमीचे लेटेस्ट Android 16 वर आधारित HyperOS अपडेट मिळणार आहे.
Xiaomi स्मार्टफोन: Xiaomi 15T Pro, Xiaomi 15T, Xiaomi 15 Ultra, Xiaomi 15, Xiaomi MIX Flip
Redmi स्मार्टफोन: Redmi Note 14 Pro Plus 5G, Redmi Note 14 Pro 5G, Redmi Note 14 Pro, Redmi Note 14
POCO स्मार्टफोन: POCO F7 Ultra, POCO F7 Pro, POCO F7, POCO X7 Pro Iron Man Edition, POCO X7 Pro, POCO X7 (फोटो सौजन्य – X)
टॅब्लेट: Xiaomi Pad Mini, Xiaomi Pad 7 Pro, Xiaomi Pad 7
वीयरेबल्स: Xiaomi Watch S4 41mm (Available now), Xiaomi Smart Band 10 Glimmer Edition (Available now), Xiaomi Smart Band 10 Ceramic Edition, Xiaomi Smart Band 10
Xiaomi स्मार्टफोन: Xiaomi 14 Ultra, Xiaomi 14, Xiaomi 14T Pro, Xiaomi 14T
Redmi स्मार्टफोन: Redmi Note 13 Pro, Redmi 15, Redmi 14C, Redmi 13, Redmi 13x
POCO स्मार्टफोन: POCO F6 Pro, POCO F6, POCO X6 Pro, POCO M7, POCO M6 Pro, POCO M6, POCO C75
टॅब्लेट: Xiaomi Pad 6S Pro 12.4, Redmi Pad 2 Pro 5G, Redmi Pad 2 Pro, Redmi Pad 2 4G, Redmi Pad 2
Xiaomi स्मार्टफोन: Xiaomi 13 Ultra, Xiaomi 13 Pro, Xiaomi 13, Xiaomi 13T Pro, Xiaomi 13T, Xiaomi 13 Lite, Xiaomi 12 Pro, Xiaomi 12, Xiaomi 12T Pro
POCO स्मार्टफोन: POCO F5 Pro, POCO F5, POCO X6, POCO M7 Pro 5G, POCO C85
Redmi स्मार्टफोन: Redmi Note 14 5G, Redmi Note 14S, Redmi Note 13 Pro+ 5G, Redmi Note 13 Pro 5G, Redmi Note 13 5G, Redmi Note 13 5G, Redmi 15 5G, Redmi 15C 5G, Redmi 15C
टॅब्लेट: Redmi Pad Pro 5G, Redmi Pad Pro, Redmi Pad SE 8.7 4G, Redmi Pad SE 8.7, POCO Pad
HyperOS 3 अपडेटमध्ये शाओमी यूजर्सना अॅपलच्या डायनमिक आईलँड सारखं HyperIsland फीचर मिळणार आहे. यासोबतच युजर्सना प्रमुख नोटिफिकेशनचे हायलाईट मिळणार आहेत. तसेच युजर्सना होम स्क्रीनवर लाईव्ह अॅक्टिव्हिटी तपासण्याची देखील सुविधा मिळणार आहे. यासोबतच यूजर्स रियल-टाइम डिवाइस इन्फॉर्ममेशनमध्ये चार्जिंग स्पीड देखील तपासू शकणार आहेत.
या अपडेटसोबत युजर्सना HyperAI सूटचे ऑप्शन देखील मिळणार आहे. ज्यामध्ये अनेक AI पावर्ड टूल्सचा समावेश असणार आहे. नवीन सॉफ्यवेअर अपडेटमध्ये यूजर्सना सर्चमध्ये AI चा सपोर्ट मिळणार आहे. याच्या मदतीने युजर्सना सर्च रिजल्टची समरी, लोकल स्टोरेज लोकेशन आणि AI जेनरेटेड रिस्पॉन्स देखील मिळणार आहेत. अपडेटमध्ये विजुअल कस्टमाइजेशनबद्दल बोलायचं झालं तर कंपनीने AI डायनमिक वॉलपेपरसह AI सिनेमेटिक लॉक स्क्रीन सादर केली जाणार आहे. यासोबतच, Xiaomi ने होम स्क्रीनमध्येही काही बदल केले आहेत.