Instagram वर वाईट कमेंट करणाऱ्यांची खैर नाही, लवकरच येणार नवीन फीचर; अशा प्रकारे करेल काम
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम नेहमीच त्यांच्या युजर्ससाठी नवीन फीचर रोल आऊट करत असते. आता देखील कंपनी एका नवीन फीचरची चाचणी करत आहे. खरं तर हे फीचर युजर्ससाठी बरचं फायद्याचं ठरणार आहे. इंस्टाग्राम हे फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. येथे युजर्स त्यांचे नवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. या फोटो आणि व्हिडीओवर हजारो लोकं कमेंट करतात. यातील काही कमेंट चांगल्या असतात तर काही कमेंट खराब असतात.
आतापर्यंत इंस्टाग्रामवर युजर्सना केवळ कमेंट्स लाईक करण्याचा ऑप्शन दिला जात होता. म्हणजेच तुम्हाला कमेंट आवडली किंवा नाही तरी देखील तुमच्याकडे केवळ ती कमेंट लाईक करण्याचाच ऑप्शन होता. मात्र आता तुम्ही तुम्हाला न आवडलेली कमेंट डिसलाईक करू शकता आणि कोणालाही त्याबद्दल माहितीही मिळणार नाही. कमेंट करणाऱ्या युजर्सनाही कळणार नाही की त्यांची कोणतीही कमेंट डिसलाईक झाली आहे. इंस्टाग्रामचं हे फीचर लवकरच रोल आऊट केलं जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
इंस्टाग्राम युजर्सना लवकरच कमेंट्स डिसलाईक करण्याचा एक नवीन पर्याय मिळू शकतो. मेटा सध्या यासाठी चाचणी घेत आहे. काही युजर्सनी इंस्टाग्रामवरील कमेंट सेक्शनमध्ये डिसलाइक बजेट देखील पाहिले आहे. यानंतर कंपनीनेही याची पुष्टी केली आहे. हे वैशिष्ट्य फीडवरील पोस्ट आणि रील्स दोन्हीवर विझीबल असेल. यानंतर, युजर्सना कोणतीही कमेंट आवडली नाही किंवा ती रिल किंवा पोस्टसंबंधित वाटत नसल्यास युजर्स ती कमेंट डाउनवोट किंवा डिसलाईक करू शकतील.
इंस्टाग्रामचे प्रमुख अॅडम मोसेरी म्हणाले की, इंस्टाग्राम युजर्सचा फोटो आणि व्हिडीओवर कमेंट अनुभव सुधारण्याच्या उद्देशाने हे फीचर सादर केले जात आहे. कमेंटवर मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे, कंपनी कमेंट कोणत्या क्रमाने प्रदर्शित करावी हे ठरवू शकेल. उदाहरणार्थ, जर एखादी कमेंट खूप नापसंत केली गेली तर ती कमेंट सेक्शनच्या तळाशी दिसेल. आम्ही तुम्हाला सांगतो की अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बऱ्याच काळापासून अशा पद्धतींवर काम करत आहेत. डिसलाईक बटण सादर करणे हा देखील असाच एक प्रयत्न होता, परंतु त्याच्या गैरवापराची प्रकरणे देखील समोर आली आहेत. मात्र आता लवकरच युजर्सना या नवीन फीचरचा वापर करता येणार आहे.
या दिवशी लाँच होणार Apple चा नवीन फॅमिली मेंबर, टिम कुक ने जारी केली टीझर! युजर्सची उत्सुकता शिगेला…
रोमांस स्कॅमच्या वाढत्या घटनांमध्ये, मेटा एक नवीन वैशिष्ट्य सादर करण्याच्या तयारीत आहे. हे फीचर सर्वात आधी इंस्टाग्राम युजर्ससाठी उपलब्ध असेल. हे वैशिष्ट्य युजर्सना अशा अकाऊंटसोबत चॅट करण्यापूर्वी सेफ्टी नोटिस पाठवेल जे यापूर्वी कोणत्याही संशयास्पद अॅक्टिव्हिटीमध्ये सहभागी आहेत. या सेफ्टी नोटिसच्या मदतीने, युजर्स हे जाणून घेऊ शकतील की ज्या अकाऊंटसोबत ते संवाद साधणार आहेत त्यांनी भूतकाळात काहीतरी चूक केली आहे. इंस्टाग्रामनंतर, हे फीचर मेटा, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसाठी देखील आणले जाऊ शकते. इतर फीचर्सप्रमाणेच हे फीचर देखील युजर्ससाठी अत्यंत फायद्याचे ठरणार आहे.