संग्रहित फोटो
बुलढाणा : राज्यात लाच घेण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागतून लाच घेतल्याचे प्रकरण उघडकीस येत असतात. अशातचं आता बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कथित फसवणुकीच्या प्रकरणाची चौकशी न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलिस कर्मचारी अनिल कुकडेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई 16 एप्रिल रोजी रात्री करण्यात आली आहे.
एकीकडे बुलढाणा शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांची तातडीने खामगाव नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्याचवेळी होम डीवायएसपी असलेले पोलीस निरीक्षक रवी राठोड यांना बुलढाणा शहर पोलिस ठाण्याचा पदभार देण्यात आला. नवीन ठाणेदार पदभार स्वीकारत असतानाच बुलढाणा शहरातील कारंजा चौकात एका चहाच्या टपरीवर पाच हजारांची लाच स्वीकारताना पोलिस कर्मचारी अनिल कुकडे याला रंगेहात पकडण्यात आले. प्रारंभी या प्रकरणात 20 हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. त्यानंतर 15 हजार रुपयांवर तडजोड झाली आणि त्यातील 5 हजार रुपये स्वीकारताना कुकडे जाळ्यात अडकला. नवीन ठाणेदार पदभार स्वीकारत असतानाच पोलिस कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
वनरक्षकाला एसीबीने लाच घेताना पकडले
वनविभागाच्या जागेत खोदलेल्या खड्डयाप्रकरणी कारवाई न करण्यासाठी शेतकऱ्याकडून एक लाख रुपयांची लाच घेताना वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. गोविंद रामेश्वर निर्डे (वय ३२) असे अटक केलेल्या वनरक्षकाचे नाव आहे. याबाबत एका शेतकरी तरुणाने एसीबीकडे तक्रार दिली होती. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात निर्डे याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.