एसटी बसस्थानकांचा कायापालट होणार! दर १५ दिवसांनी राबवली जाणार स्वच्छता मोहीम; प्रवाशांना मिळणार हायटेक सुविधा (Photo Credit- X)
काय आहे ‘स्वच्छता ॲक्शन प्लॅन’?
महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या मंथनानुसार, बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी खालील पावले उचलली जाती. बसस्थानकातील बैठक व्यवस्था, फरशी, भिंती, काचा आणि विशेषतः शौचालयांची सखोल स्वच्छता केली जाईल. साचलेला कचरा, अनावश्यक झाडे-झुडपे आणि जाहिरातींचे जुने फलक हटवले जातील. कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी स्वतंत्र डबे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी नियमित स्वच्छता आणि देखभाल ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
लोकसहभागातून अभियान यशस्वी करणार
ही मोहीम केवळ सरकारी कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित न राहता, यात स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था, विद्यार्थी आणि नागरिक यांचाही सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे. या मोहिमेची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखांवर सोपवण्यात आली असून, यामुळे प्रवासी सेवेची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल.
स्वच्छता तर होईल, पण सुरक्षेचे काय?
एकीकडे स्वच्छतेचा संकल्प केला जात असला तरी, छत्रपती संभाजीनगरमधील कोतवालपुरा (CBS) बसस्थानकावर प्रवाशांना इतरही गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. कचरा आणि घाणीसोबतच मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. खासगी बसचे एजंट प्रवाशांना पळवतात, तर भिकारी आणि चोरट्यांच्या टोळ्यांमुळे प्रवाशांचे पाकीट व सामान चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. हजारो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केवळ २-३ पोलिस कर्मचारी अपुरे पडत आहेत. नवीन स्वच्छता योजनेत या सामाजिक समस्यांच्या निराकरणाचा समावेश नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
पाण्यासाठी अजून वर्षभर वाट बघा… संभाजीनगरमध्ये हे काय बोलून गेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळें






