नागपुरात शहरात गेल्या दीड वर्षात ७३० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातून ५४० प्रकरणांमध्ये अंमली पदार्थांची विक्री आणी साठवणूक संबंधित गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गेल्या दीड वर्षात नागपूर शहरात आठ कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांची जप्ती करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी दिली. ‘ऑपरेशन थंडर’ या नावाची विशेष मोहीम नागपुर शहरात राबिविण्यात येत असल्याचे देखील रवींद्र सिंघल यांनी सांगितले.
नागपूर शहर ड्रग फ्री करण्याच्या उद्देशाने 20 ते 26 जूनदरम्यान ‘अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सप्ताह’ साजरा केला जाणार आहे. पोलीस आयुक्तालयाच्या पुढाकाराने हा सप्ताह राबविण्यात येणार असून, एकत्र येऊया, नशामुक्त समाज घडवूया’ या घोषवाक्याखाली शहरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच विविध खेळांचे खेळाडू यांच्या सहभागातून जनजागृती होणार आहे. या अभियानादरम्यान, अंमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या एक वर्षात सुमारे 8 कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांनी दिली.
1. एमडी (मेथैम्पेटामीन):
एकूण 94 प्रकरणांत 6 कोटी 81 लाख रुपये किमतीची एमडी पावडर* जप्त. एकूण 6 किलो एमडी जप्त; 186 आरोपींना अटक.
2. गांजाः
100 प्रकरणांत 1 कोटी 66 लाख रुपयांचा गांजा जप्त. एकूण 132 आरोपींवर अटक.
3. चरस:
70 ग्रॅम चरस, किमान किमत 70 लाख 75 हजार रुपये जप्त.
4. डोडा:
एका प्रकरणात 128 किलो डोडा जप्त, किमत 10 लाख 28 हजार रुपये
5. अफू (अफीम):
एका प्रकरणात 548 ग्रॅम अफीम जप्त, किमत 6 लाख 18 हजार रुपये एक आरोपी अटकेत.
नागपूरात दिवसाढवळ्या सोनसाखळी चोरीच्या दोन घटना
नागपुरात अवघ्या काही तासात दोन ज्येष्ठ महिलांसोबत सोनसाखळी चोरल्याच्या घटना घडल्या आहेत आणि या चोरी एकाच टोळीने केल्याचं समोर आलं आहे.या चोरीचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. भर रस्त्यात ही घटना घडल्यामुळे नागपुरातील रस्त्यांवर चोर बिनधास्त फिरत आहेत कि काय? असा प्रश्न समोर आला आहे.
पहिली चोरी:
६० वर्षीय ज्येष्ठ महिला भाजी बाजारातून भाजी घेऊन पायी घराकडे जात असतांना दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांची गळ्यातील १ तोळ्याची सोनसाखळी हिसकावून नेली. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. ही घटना सदर पोलीस स्टेशन अंतर्गत आझाद चौक येथे सकाळी नऊ वाजता घडली आहे.
दुसरी घटना :
६२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सव्वा टोळ्यांची सोन्याची चेन चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून नेली. ही घटना धंतोली पोलीस स्टेशन अंतर्गत समर्थ नगर भागात सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
या दोन घटनेने नागपुरात खळबळ उडाली आहे. आरोपींचा अद्याप कुठलाही सुगावा लागेलेला नाही आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीना शोधून काढणं हे आता पोलिसांपुढे आव्हान आहे.