संग्रहित फोटो
या कार्यकारणीच्या निमित्ताने पक्षातील कार्यकर्त्यांना पद देऊन त्यांना जाेडून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ही जम्बाे कार्यकारणी जाहीर करण्यामागे पक्षातील नाराजी दुर करण्याचाही प्रयत्न असल्याची चर्चाही सुरु झाली आहे. पुर्व विभागात पुणे शहरातील वडगांव शेरी, हडपसर, शिवाजीनगर, कसबा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. पुर्व शहर कार्यकारणीमध्ये रुपाली पाटील – ठाेंबरे यांचा समावेश केला गेला आहे.
पुर्वी हाजी फिराेज शेख हे एकमेव कार्याध्यक्ष हाेते, रुपाली पाटील – ठाेंबरे यांच्याकडे कार्याध्यक्षपदावर नियुक्ती करुन त्यांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला गेल्याचे दिसते. माजी आमदार महादेव बाबर यांच्याकडे प्रदेश प्रतिनिधी म्हणून जबाबदारी साेपविली गेली आहे. संभाजी ब्रिगेडला रामराम ठाेकून पक्षात प्रवेश करणारे विकास पासलकर यांना प्रवक्ता म्हणून नियुक्त केले आहे. राकेश कामठे यांची शहर समन्वयक, माजी नगरसेवक बाळासाहेब बाेडके, बाळासाहेब काेद्रे, नारायण लाेणकर आणि विजय ढेरे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष कार्याध्यक्ष यांची नियुक्ती केली आहे. तर कार्यकारणीमध्ये ३९ जणांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. शहर सरचिटणीस पदाची जबाबदारी २२ जणांकडे, शहर चिटणीस पदाची जबाबदारी १७ जणांकडे, संघटक सचिव पदाची जबाबदारी २० जणांकडे जबाबदारी साेपविली आहे.
महिला कार्यकारिणीत समावेश
हसीना ईनामदार यांची महिला सेलच्या अध्यक्षपदी, युवक सेलच्या अध्यक्षपदी आमदार चेतन तुपे यांचा मुलगा ईशान तुपे यांची, युवती सेलच्या अध्यक्षपदी लावण्या शिंदे, विद्यार्थी सेलच्या अध्यक्षपदी विशाेल माेरे , बाळा चव्हाण यांची सामाजिक न्याय सेल, अर्जुन गरुड यांची ओबीसी सेल, समीर शेख यांची अल्पसंख्याक सेल, प्रदीप चाेपडे यांची सेवादल सेल, विठ्ठल काेथरे यांची अनुसुचित जमाती सेल, विजय जाधव यांची भटक्या विमुक्त जाती जमाती सेल, राजेंद्र देशमुख यांची क्रिडा सेल, अशाेक जाधव यांची क्रिडा सेल, प्रदीप चांधेरे यांची लिगल सेलच्या अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.






