(फोटो सौजन्य – Pinterest)
आयुष्यात एकदा तरी परदेशी जावं असं प्रत्येकाचं स्वप्न असत. मात्र बजेटमुळे आपले हे स्वप्न स्वप्नच बनून राहते. मात्र अनेकांना हे ठाऊक की आपल्या बजेटमध्ये देखील आपल्याला परदेशाची सफर करता येऊ शकते आणि तेही कमी पैशात… होय आम्ही जे सांगत आहोत ते खरं आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला युरोप देशात जाण्यासाठी बजेटची आणि ट्रीपची स्वस्तात प्लॅनिंग कशी करावी यासाठीच्या काही सोप्या टिप्स सांगत आहोत. कोणत्याही देशात जाण्यापूर्वी आधी तिथली संस्कृती, नियम आणि हवामान लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमची युरोप ट्रिप अधिक मजेदार आणि आरामदायी बनवू शकता. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.
व्हिसा आणि डॉक्युमेंट्स आधीच ठेवा तयार
युरोपातील बहुतेक देश शेंजेन व्हिसाच्या अंतर्गत येतात. म्हणजेच एका व्हिसाने तुम्ही २७ देशांमध्ये प्रवास करू शकता. तथापि, या ठिकाणासाठी व्हिसा मिळवणे सोपे नाही. या व्हिसासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया थोडी लांब आहे. या व्हिसासाठी तुम्हाला साधारण दोन महिन्यांआधी अर्ज करावा लागेल. यासोबतच पासपोर्टची व्हॅलिडिटी देखील 6 महिन्यांपेक्षा जास्त असावीलागेल.
कॅश आणि कार्ड दोन्ही सोबत असूद्यात
आम्ही तुम्हाला सांगतो की युरोपमधील अर्ध्याहून अधिक ठिकाणी तुम्हाला फक्त कार्डद्वारे पेमेंट करावे लागेल. पण काही लहान दुकानांमध्ये किंवा स्थानिक बाजारपेठांमध्येही रोख रक्कम वापरली जाते. अशा परिस्थितीत, युरोपला जाण्यापूर्वी आपल्या पैशांचे युरो चलनात बदल करून घेणे महत्त्वाचे ठरेल.
हवामानाला ग्राह्य धरा
युरोपमध्ये भारताइतके गरम वातावरण नाही. दिवसा सूर्यप्रकाश चांगला असतो, परंतु संध्याकाळी इथे थंडी वाढू लागते. अशा परिस्थितीत, युरोपला जाताना थंडीचे कपडे सोबत आवर्जून पॅक करावेत.
लोकल ट्रान्सपोर्टने प्रवास करा
युरोपीय शहरांमध्ये उत्कृष्ट मेट्रो, ट्राम आणि बसची व्यवस्था आहे. या साधनांच्या मदतीने तुम्ही कमी पैशात प्रवास करू शकता. आपल्या बजेटमध्ये तुम्ही कॅबऐवजी, स्थानिक वाहतुकीने प्रवास निवडावा.
आधीच हॉटेल बुकिंग करून ठेवा
युरोपमध्ये गर्दीच्या काळात लोकांची वर्दळ फार असते. विशेषतः पॅरिस आणि स्वित्झर्लंड सारखी ठिकाणे पर्यटकांनी भरलेली असतात. अशा परिस्थितीत हॉटेल्स महागडे असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी हॉटेल रूम आधीच बुक करून ठेवावी.
लोकल सिम कार्ड
भारतातून आंतरराष्ट्रीय रोमिंग महाग असू शकते. त्यामुळे, युरोपमध्ये पोहोचल्यानंतर तुम्ही स्थानिक सिम कार्ड किंवा eSIM खरेदी केल्यास ते तुमच्यासाठी चांगले ठरेल. याद्वारे तुम्हाला कॉल आणि इंटरनेट दोन्ही स्वस्त दरात मिळतील.
सुट्ट्यांमध्ये करा परदेशी पर्यटनाचा प्लॅन, व्हिसाची गरज नाही; तिकीटाची किंमत फक्त 1856 रुपये
या ठिकाणांना पाहायला विसरू नका
बल्गेरिया
हा आग्नेय युरोपमधील एक देश आहे. तुम्ही १ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत बल्गेरियाला प्रवास करू शकता. इथे तुम्हाला अनेक ऐतिहासिक स्थळे, सांस्कृतिक स्थळे आणि निसर्गरम्य पाहायला मिळतील.
रोमानिया
हा पूर्व युरोपमधील एक सुंदर देश आहे, इथे पर्यटकांना पाहण्यासाठी ऐतिहासिक किल्ले, चर्च आणि अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. येथे राहणे आणि प्रवास करणे खूप स्वस्त आहे. विमान भाडे सोडले तर अवघ्या ५० हजार रुपयांमध्ये तुम्ही रोमानियालाही भेट देऊ शकता
स्लोवाकिया
हे मध्य युरोपातील एक सुंदर आणि सुरक्षित देश आहे. इथे पर्यटकांना उंच पर्वतांचे दृश्य, ऐतिहासिक किल्ले, आकर्षक शहरं आणि सांस्कृतिक परंपरा यांचा आनंद घेता येतो. तुम्ही १ लाख रुपयांमध्ये इथे तुमचे ट्रिप प्लॅन करू शकता.
हंगेरी
हे मध्य युरोपातील एक सुंदर देश आहे, जो त्याच्या समृद्ध इतिहासासाठी, आकर्षक वास्तुकलेसाठी आणि सांस्कृतिक विविधतेसाठी ओळखला जातो. येथे तुम्हाला ३ ते ४ हजार रुपयांमध्ये हॉटेल मिळतील. त्याचबरोबर इथे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये अनेक उत्कृष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येईल.