(फोटो सौजन्य – Pinterest)
काश्मीरमधील पहलगाम येथील घनदाट जंगलांनी वेढलेले सुंदर बैसरन खोरे, जिथे दहशतवादी हल्ला करण्यात आला. मंगळवारी २२ एप्रिल २०२५ हा दिवस सामान्य दिवसाप्रमाणे सुरू झाला. या परिसरात १,००० ते १,५०० पर्यटक उपस्थित होते आणि ते सर्व सुंदर दृश्यांचा आनंद लुटत होते. दिवस जात असताना पर्यटकांची संख्या वाढत गेली, पण दुपारी अचानक दशतवाद्यांनी इथे हल्ला चढवला आणि हिरवीगार शेते असलेली दरी पर्यटकांच्या रक्ताने माखली. तुम्हाला सांगतो की, बैसरन व्हॅलीला देशाचे “मिनी-स्वित्झर्लंड” म्हटले जाते. या ठिकाणी देशातूनच काय तर जगभरातून पर्यटक भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने येथे येत असतात. सौंदर्याच्या बाबतीत, हे ठिकाण प्रसिद्ध पर्यटन स्थळांनाही मागे टाकते.
सुट्ट्यांमध्ये करा परदेशी पर्यटनाचा प्लॅन, व्हिसाची गरज नाही; तिकीटाची किंमत फक्त 1856 रुपये
काश्मीरला भेट देण्यासाठी येणाऱ्या सर्व पर्यटकांच्या यादीत पहलगामचा समावेश ठरलेला आहे. पहलगामला येणारे बहुतेक पर्यटक बैसरन खोऱ्याचा नक्कीच शोध घेतात, कारण हे ठिकाण “मिनी-स्वित्झर्लंड” म्हणून ओळखले जाते. हिवाळ्यात हे ठिकाण बर्फाच्या पांढऱ्या चादरीने झाकलेले असते, तर उन्हाळ्यात हे ठिकाण हिरव्यागार कुरणात बदलते. इथे पोहोचल्यानंतर असे वाटते की जणू तुम्ही खरोखर स्वित्झर्लंडच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये फिरत आहात.
कुठे आहे बैसरन व्हॅली?
दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम या डोंगराळ शहरापासून सुमारे ५ किमी अंतरावर बैसरन व्हॅली आहे, परंतु येथे फक्त पायी किंवा घोड्यावरून प्रवास करून पोहोचता येते. पहलगामला बैसरन व्हॅलीशी जोडणारा ५ किमी लांबीचा मातीचा रस्ता आहे. पहलगामपासून अंतर असल्याने, दहशतवादी हल्ल्यानंतर तात्काळ बचाव कार्य सुरू करणे अधिक कठीण झाले. आम्ही तुम्हाला सांगतो, या दरीत तुम्हाला बर्फाच्छादित पर्वत, घनदाट पाइन जंगले आणि पसरलेले हिरवे गवताळ प्रदेश पाहायला मिळतील. येथील नैसर्गिक सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी इथे हजारो पर्यटक येतात.
इथे झालंय अनेक चित्रपटांचे शूटिंग
बैसरन व्हॅली ही केवळ पर्यटकांचीच नाही तर बॉलिवूड दिग्दर्शकांचीही पहिली पसंती आहे. आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या घाटीत अनेक बॉलिवूड चित्रपटांचे शूटिंग झाले आहे, ज्यात कश्मीर की कली (1964), आरजू (1965), जब जब फूल खिले (1965), कभी कभी (1976), सिलसिला (1981), सत्ते पे सत्ता (1983) आणि बेताब (1983) (1983) सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.
ट्रेकर्ससाठी विशेष आकर्षण
तुलियन तलावापर्यंत पुढे जाऊन लिडर व्हॅलीच्या विहंगम दृश्यांचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या ट्रेकर्ससाठी बैसरन व्हॅली हे एक प्रसिद्ध कॅम्पसाईट आहे. एवढेच नाही तर लोक बैसरन व्हॅलीमध्ये झिप लायनिंग, झॉर्बिंग सारख्या साहसी ऍक्टिव्हिटीजचाही आनंद लुटू शकतात.
इथे काय आहे फेमस
पहलगाम हे जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुमारे ९० किमी अंतरावर आहे. पहलगाम हे अमरनाथ यात्रेचे बेस कॅम्प म्हणून खूप लोकप्रिय आहे. अमरनाथ यात्रा दोन मार्गांनी केली जाते, पहिला मार्ग पहलगाम तर दुसरा मार्ग बालटाल, मात्र बहुतेक यात्रेकरू पहलगामचा मार्ग निवडतात. यावर्षी अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरु होणार आहे.