फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सुरत हे गुजरातमधील एक महत्त्वाचे व्यापारी शहर आहे. हे शहर तापी नदीच्या किनारी वसलेले आहे. हे शहर त्याच्या हिरवळीच्या वस्त्र उद्योगासाठी आणि हिरे व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. सुरतला “सिल्क सिटी” आणि “डायमंड सिटी” म्हणूनही ओळखले जाते. येथील प्राचीन वास्तुकला, सुंदर समुद्र किनारे आणि विविध संस्कृती पर्यटकांना आकर्षित करतात. डुमास बीच, द ग्रेट फन ॲम्युझमेंट पार्क, आणि सरठाणा नेचर पार्क ही सुरतमधील प्रमुख आकर्षण स्थळे आहेत. सुरतची खानदानी खाद्यपदार्थ आणि मिठाया देखील खूप प्रसिद्ध आहेत. ही मिठाई येथील सांस्कृतिक वैविध्य दर्शवतात.
आज आपण सुरतमधील या खास ठिकाणांबद्दल जाणून घेणार आहोत. या ठिकाणांना तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत भेट देऊ शकता.
द ग्रेट फन ॲम्युझमेंट पार्क
तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर सुरतमधील द ग्रेट फन ॲम्युझमेंट पार्कला भेट देण्याचा नक्की विचार करा. येथे तुम्ही विविध प्रकारच्या राइड्स आणि ॲक्टिव्हिटींचा आनंद घेऊ शकता. साहस, मजा आणि मनोरंजनासाठी हे ठिकाण परिपूर्ण आहे. गेट भेसन रोड, जहांगीराबाद, मोरा भागल येथे स्थित हे पार्क सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत उघडे असते.
हे देखील वाचा- IRCTC ची ‘रॉयल राजस्थान’ टूर; कमी बजेटमध्ये देता येणार ‘या’ शहरांना भेट
डुमास बीच
जर तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत सूर्यास्त आणि सूर्योदयाचा आनंद घ्यायचा असेल तर हे पाहण्यासाठी गुजरामधील डुमास बीच हे सर्वोत्तम ठिकाण आहे. या समुद्राचे सुंदर दृश्य, शांत आणि रोमँटिक वातावरण हे जोडप्यांसाठी परिपूर्ण आहे. लाटांचे आवाज आणि थंड हवेची झुळूक येथील रोमँटिक वातावरण निर्माण करतात. येथे आल्यावर पावभाजी, कॉर्न, चहा आणि भजी सारख्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला विसरू नका.
सरठाणा नेचर पार्क
जर तुम्ही निसर्ग आणि वन्यजीवप्रेमी असाल तर गुजरातमधील सरठाणा नेचर पार्कला नक्की भेट द्या. हे ठिकाण वन्यजीव प्रेमींसाठी अत्यंत आकर्षक आहे. हिरवळ, शांत वातावरण आणि तलावांनी वेढलेले मार्ग यामुळे हे ठिकाण खूपच रमणीय वाटते. तुम्हाला जर फोटोग्राफीची आवड असेल तर हे फोटोग्राफीसाठीही उत्कृष्ट आहे. हिरवीगार शेतं आणि सावलीची झाडांसह हे ठिकाण आणखीनच आकर्षक बनवतात.
सुरतमध्ये तुमच्या जोडीदारासोबत भेट देण्यासाठी ही ठिकाणे नक्कीच रोमँटिक आणि आनंददायक ठरतील. येथील निसर्गाची आणि वातावरणाची विशेष झलक अनुभवायची असेल तर सुरतला नक्की भेट द्या. त्यामुळे या महिन्यात सुरतमध्ये प्रवासाची योजना करा आणि तुमच्या सहलीला अविस्मरणीय बनवा.