बीडच्या तहसील कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्षवेधी आंदोलन केलंय. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांवर सर्वसामान्यांना निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप होत असल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाबाहेर स्वस्त धान्य दुकानातील तांदळाची खिचडी शिजवून तहसीलदारांना भेट दिलीय. ही खिचडी थेट तहसीलदाराच्या टेबलवर मांडत त्यांना या प्रश्नावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. बीड तालुक्यातील अंजनवती, चराटा, काळेगाव हवेली यासह इतर गावांमध्ये निकृष्ट दर्जाचे स्वस्त धान्याचे वितरण होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी हे लक्षवेधी आंदोलन केले आहे. दक्षता समिती केवळ कागदोपत्री असून ती सक्षम केली जावी जेणेकरून यावर नियंत्रण होईल असे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या मागण्यांवर आपण सकारात्मक निर्णय घेणार असून सर्वच दुकानदारांना लेखी सूचना देणार असल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी म्हटले आहे.