अहिल्यानगर शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय चौकामध्ये फ्लेक्स पडून मुख्य वीज वाहक तारांवर अडकला. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून याकडे महावितरण, महानगरपालिकेसह पोलीस प्रशासनाचे देखील दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय चौकातून दिवसभर वाहनांची वर्दळ असते. घाटकोपर दुर्घटनेची आठवण करून देणारी ही घटना असून, प्रशासन आणि महावितरण यांचे दुर्लक्ष स्पष्टपणे दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.