फोटो सौजन्य - सोशल मिडिया
Bangladesh announces squad for T20 World Cup : २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्व संघ आता २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या तयारीला लागले आहेत. सोशल मिडियावर अनेक संघासाठी या स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली होती. त्यानंतर आता बांग्लादेशने देखील भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी संघाची घोषणा केली आहे. भारत आणि बांग्लादेश या दोन देशांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे.
मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून वगळण्यात आल्यानंतर सुरू झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) रविवारी पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला. रहमानचा संघात समावेश आहे आणि तो यावेळी त्याचे सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करेल. या संघाचे नेतृत्व अनुभवी फलंदाज आणि यष्टीरक्षक लिटन दास करत आहेत.
बांगलादेशने अद्याप या फॉरमॅटमध्ये विश्वचषक उपांत्य फेरीत खेळलेला नाही आणि यावेळी संघ इतिहास बदलण्याचा प्रयत्न करेल. विश्वचषक भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित करतील, जिथे परिस्थिती बांगलादेशसारखीच आहे. त्यामुळे या संघाला हलके घेता येणार नाही. फलंदाजीत, कर्णधार लिटन दास, तन्झिद हसन आणि परवेझ हुसेन इमॉन यांच्याकडून सर्वात जास्त अपेक्षा असतील. जर बांगलादेशला या विश्वचषकात चांगली कामगिरी करायची असेल तर या तिघांनीही चांगली कामगिरी करणे महत्त्वाचे असेल.
गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर रहमान महत्त्वाची भूमिका बजावेल. तस्किन अहमदवरही महत्त्वाची जबाबदारी असेल. भारत आणि श्रीलंकेतील खेळपट्ट्या फिरकीपटूंना अनुकूल असल्याने या विश्वचषकात फिरकीपटू चमकण्याची शक्यता आहे. त्यामुळे संघात फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची असेल.
🚨 BANGLADESH SQUAD FOR THE T20 WORLD CUP 🚨 Litton Das (C), Tanzid Hasan, Emon, Saif Hassan, Hridoy, Shamim Hossain, Nurul Hasan, Mahedi Hasan, Rishad, Nasum Ahmed, Mustafizur Rahman, Tanzim Hasan, Taskin, Shaif Uddin, Shoriful Islam pic.twitter.com/G7gFLkDdXj — Johns. (@CricCrazyJohns) January 4, 2026
सध्या भारतात बांगलादेशविरोधी भावना आहे आणि म्हणूनच रहमानला आयपीएलमधून वगळण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, बीसीबी आयसीसीला त्यांचे सामने श्रीलंकेत हलवण्याची विनंती करण्याची योजना आखत आहे. बीसीबीचा असा विश्वास आहे की जर करारबद्ध खेळाडूला भारतात खेळणे कठीण झाले तर ते संपूर्ण संघासाठी अत्यंत असुरक्षित असेल. बीसीबी आपली विनंती आयसीसी अध्यक्ष जय शाह यांना सादर करेल.
टी-२० विश्वचषकासाठी बांगलादेश संघ-
लिटन दास (कर्णधार), तनजीद हसन, परवेझ हुसेन इमॉन, सैफ हसन, तौहीद हदोय, शमीम हुसैन, काझी नुरुल हसन सोहन, साक मेहिदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तन्झिम हसन साकिब, तस्किन अहमद, शैफुल इस्लाम, शैफुल इस्लाम, तस्किन.






