सध्या मुंबईत तापमानाने उच्चांक गाठला असून, कडक उन्हामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणाऱ्या भागांमध्ये नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) हे एक महत्त्वाचे ठिकाण असून, आवश्यक कामांसाठी येथे येणाऱ्या नागरिकांना उष्णतेचा प्रचंड फटका बसतो आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पुढाकार घेत, RTO कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी, अशी मागणी केली आहे. मनसेच्या वतीने RTO अधिकाऱ्यांना निवेदन देत तातडीने शेड्सआणि थंड पाण्याची सोय करण्याची विनंती करण्यात आली आहे.मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे RTO कार्यालयाबाहेर नागरिक उन्हात उभे राहून हैराण होत आहेत. थोडीशीही सावलीची सोय नाही. त्यामुळे वृद्ध, महिला व लहान मुलांना अधिक त्रास होत आहे.”प्रशासनाने लवकरात लवकर योग्य उपाययोजना कराव्यात, असं मनसे कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे.