साने गुरूजींचे गाव असणाऱ्या पालगड येथील ज्या शाळेत साने गुरुजी शिकले ती जिल्हा परिषद शाळा क्र. 1 चे 27 लाख रुपये खर्चुन काम करण्यात येत आहे. परंतु हे काम निकृष्ट दर्जाचे असून काम अपूर्ण असल्याने शाळा गळकी झाली आहे. एवढा पैसा खर्चुन जर शाळा व्यवस्थित नसेल तर विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. या शाळेची पाहणी पालक, सरपंच, ग्रामस्थांनी देखील केली. यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत कुठे करणार, पावसात का? असा सवाल देखील विचारण्यात आला आहे.