डोंबिवली रेल्वे पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी चौधरी, बांबले, बोईनवाड, आणि जाधव हे ठाकुर्ली रेल्वे स्टेशन परिसरात गस्त घालत असताना, १५ ऑगस्टच्या सायंकाळच्या सुमारास, कल्याण स्लो लोकलच्या महिलांच्या डब्याच्या मागील जनरल डब्यात एक काळ्या रंगाची बेवारस बॅग आढळली. या पथकाने ती बॅग ताब्यात घेऊन डोंबिवली पोलिस ठाण्यात आणली. तपासणी दरम्यान, या बॅगमध्ये 1 लाख 62 हजार रुपये रोख रक्कम आढळली. चौकशीअंती, बॅग डोंबिवली पश्चिमेतील रहिवासी जयराम शेट्टी यांची असल्याचे निष्पन्न झाले. शेट्टी हे बॅग लोकलमध्ये विसरले होते. त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून शहानिशा केल्यानंतर, रेल्वे पोलिसांनी ही बॅग शेट्टी यांच्या स्वाधीन केली. शेट्टी यांनी लोहमार्ग पोलिसांच्या प्रामाणिकतेचे कौतुक करून आभार व्यक्त केले.