१८० कोटींच्या निधीतून डोंबिवलीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'क्रीडा संकुल' साकारणार (Photo Credit - X)
१८० कोटींच्या निधीतून भव्य क्रीडा संकुलांची उभारणी
सुमारे ₹१८० कोटी रुपयांच्या निधीतून या भव्य क्रीडा संकुलांची उभारणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब आणि उद्योगमंत्री मा.ना.श्री. उदय सामंत यांच्या विशेष सहकार्याने या क्रीडा संकुलाचे काम प्रगतीपथावर जात आहे.
दोन टप्प्यांत होणार संकुलाची उभारणी
टप्पा १: यामध्ये इंडोर क्रीडासंकुल (Indoor Sports Complex) आणि ऑलिम्पिक दर्जाचा तरणतलाव (Swimming Pool) उभारण्यात येणार आहे.
टप्पा २: या टप्प्यात भव्य स्टेडियम (Stadium) उभारणीचे काम होईल.
हे देखील वाचा: ठाणे महापालिका क्षेत्रात यंदा ४ लाख २१ हजार मतदार वाढले, प्रारूप मतदारयादी जाहीर
अत्याधुनिक सुविधांचा समावेश
या आधुनिक क्रीडासंकुलात अनेक अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील. पंचवीस हजार चौ.मी. क्षेत्रफळाची बहुमजली क्रीडा इमारत. एक हजार दोनशे पन्नास चौ.मी. क्षमतेचा आंतरराष्ट्रीय मानकांचा तरणतलाव आणि चारशे चौ.मी.चा डायव्हिंग पूल व प्लॅटफॉर्म. सोळा हजार चौ.मी. क्षमतेची तळघर पार्किंगची (Basement Parking) सोय. योगा, जिम्नॅशियम, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कराटे, मार्शल आर्ट, जुडो, स्क्वॅश, स्नूकर, शूटिंग रेंज आणि जिम्नॅस्टिक अशा विविध क्रीडा प्रकारांसाठी येथे अत्याधुनिक सोयी उपलब्ध असतील.
खेळाडूंसाठी निवास आणि पुनर्वसन
या प्रकल्पात केवळ खेळच नव्हे, तर खेळाडूंसाठी इतर आवश्यक सोयीसुविधांचाही समावेश आहे.
हे देखील वाचा: कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन!






