बदलापूर मध्ये जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने भव्य महाआरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराच आयोजन करण्यात आले होते. राजेश मोतीराम घावट यांच्या वाढदिवसानिमित्त सोनिवली गावातील हनुमान मंदिराजवळ हे शिबिर भरविण्यात आले.या शिबिरात नेत्र तपासणी, शुगर तपासणी आणि ब्लड प्रेशर तपासणीसह विविध आजारांवर मोफत तपासण्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे शिबिरादरम्यान तपासणी करून घेणाऱ्या रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू ऑपरेशनची सुविधा देखील देण्यात येणार असल्याची माहिती शहर अध्यक्ष दीपक बाळाराम भोईर यांनी दिली आहे.