पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेला जलजीवन योजनेच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याची कबुली खुद्द राज्याचे वनमंत्री तथा पालघरच्या पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात जल जीवन मिशन आणि मान्सूनपूर्व आढावा बैठकीच आयोजन करण्यात आलं होतं . या आढावा बैठकीत पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनांची काम निकृष्ट दर्जाची झाली असून यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचं गणेश नाईक यांनी यावेळी सांगितलं . तर निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काम सुस्थितीत करण्याची मी एक संधी देत असून ही दुरुस्ती त्यांनी सुधारावी अन्यथा कायद्याचे कठोरातकठोर कारवाई त्यांच्यावर केली जाईल असे निर्देश देखील गणेश नाईक यांनी यावेळी दिले आहे.