कोल्हापुरात नवीन राजवाड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 351 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या शिवमय वातावरणात साजरा करण्यात आला.एकीकडे दुर्गराज किल्ले रायगडावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा होतोय..तर दुसरीकडे कोल्हापुरात खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या उपस्थितीत देखील नवीन राजवाडा या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा करण्यात येतो.आज नवीन राजवाडा इथं राजर्षी शाहू महाराज ज्या ठिकाणी न्यायनिवाडा करायचे त्या दरबार हाॅलमध्ये शाहीजवाजम्यासह शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला..सनई चौघडांचे सुमधुर सूर, शाहिरी पोवाडे, विद्यार्थ्यांकडून शौर्य गीतांचे सादरीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्ण मूर्तीवर करण्यात आलेला अभिषेक असा शाही सोहळा कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर पार पडला. दरम्यान मराठा लाईट इन्फंट्री बँड आणि मर्दानी खेळांचे सादरीकरण करण्यात आले..त्यामुळे नवीन राजवाडा परिसर शिवमय बनला होता..यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील मान्यवरांनी या सोहळ्यासाठी उपस्थिती लावली आहे..माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांचे चिरंजीव यशराजे यांच्या हस्ते शिवमूर्तीवर अभिषेक करून शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला.