भर उन्हाळ्यातच लातूर शहरात पावसानं जोरदार तडाखा देत सर्वसामान्य नागरिकांची झोपच उडवली, आठवडाभर लातुरात मुक्कामी तळ ठोकून राहिलेल्या पावसानं आणि वादळी वाऱ्यानं अक्षरशः धुमाकूळ घातला आणि शहरातल्या बहुतांश भागातल्या घरांमध्ये पावसाचं आणि नाल्याचं पाणी शिरलं. अनेकांचे गृहउपयोगी साहित्य वाहून गेलं तर अनेकांच्या घरात चुलीच पेटल्या नाहीत, त्यामुळं नागरिकांत रोष आणि भय निर्माण झालं होतं. मात्र मान्सूनपूर्व तयारी जर महानगर पालिकेने एप्रिल महिन्यातच पूर्ण केली असती तर हे सर्व टाळता आलं असतं. मात्र हे सगळं झाल्यावर उशिरा का होईना लातूर महानगर पालिकेला जाग आलीय, आणि मनपाच्या वतीने मान्सून पूर्व कामाची सुरुवात झालीय, यात देखील मानपा पुन्हा चूकच करताना दिसतेय, कारण नालितला गाळ आणि घाण काढून नाली शेजारीच ढिगारा लावत असल्याने पुन्हा एकदा मनपाच्या कामावर लोकांनी संताप व्यक्त केला आहे.