विकासकामांच्या नावाखाली शासन स्तरावर जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींनां अनेक कामे सांगितली जात आहेत, मात्र त्या कामाचा मोबदला जिल्हा परिषदेकडून दिला जात नाही. तसंच जल जिवन च्या कामासाठी जागा ग्रामपंचायतींनी दिल्या मात्र जलजीवनचे पाणी गेल्या तीन वर्षांपासून कोणत्याच गावात पोहचले नाही. त्यामुळे ग्रामस्थ संतापले आहेत, तसेच विहिरी, गोठे तयार असतानाही त्याचे बजेट दिलं जात नाही. पंधराव्या, सोळाव्या वित्त आयोगाच्या पैशांवर अतिरिक्त कामाचा बोजा देखील आमच्यावर पडत आहे, याशिवाय आंगणवाडी, जिल्हा परिषद शाळांचे बिलं देखील ग्रामपंचायत अदा करत असल्याने लातूर तालुक्यातील सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेत निदर्शने करून निवेदन देण्यात आलंय. जर मागण्या मान्य नाही झाल्या तर उग्र आंदोलन करण्याचा ईशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.