गेल्या आठवड्याभरापासुन लातूर जिल्ह्यात पडत असलेल्या जोरदार अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळं फळ पिकांचे मोठे नुकसान झालं आहे. त्यातच टरबूज पिकाचं देखील अतोनात नुकसान झालंय सतत झालेल्या जोरदार पावसामुळे टरबूज पिकाच्या शेतात पाणी साचून काढणीला आलेल्या टरबूज पिकाला आता बुरशी लागली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिराऊन नेला आहे. त्यामुळं शेतकरी आसमानी संकटात सापडला आहे. आता नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.