कळवण उपजिल्हा रुग्णालयातील कंत्राटी सफाई कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून वेतनापासून वंचित असून, या अन्यायाविरोधात बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे रुग्णालयातील स्वच्छतेचे काम ठप्प झाले असून, रुग्ण व नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे. कळवण उपजिल्हा रुग्णालयात MVG कंपनीमार्फत १४ कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना उपासमारीची वेळ आली असून, आर्थिक अडचणींमुळे त्यांचे कुटुंबही मोठ्या संकटात सापडले आहे.