मुंब्रा पोलीस स्टेशन, अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस अधिकाऱ्यांनी थर्टी फस्टच्या अनुषंगाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मुंब्रा पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ विरोधी गस्त करत असताना पोलीस हवालदार कलगोंडा बन्ने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार काल पहाटे ०३:०० वाजत सुमारास मुंब्रादेवी मंदिर पायथ्यालगत बोगद्याजवळ सापळा रचत कारवाई करत प्रतिबंधीत औषधींचा साठा जप्त केला आहे. मानवी शरीरावर अपाय करणाऱ्या एकूण २४० कोडीनयुक्त प्रतिबंधीत औषधी बॉटलचा (कोरेक्स) साठा हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये मुंब्रा पोलीस स्टेशन गु.रजि.क. २५५०/२०२४ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (क) सह औषधे व सौदर्य प्रसाधने अधिनियम १९४० चे कलम १८, (क), १८ (अ) २७ (बी), २८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक विजय सानप हे करत असुन ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात मादक पदार्थाचे रॅकेट चालवणारी मोठी टोळी असण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने तपास करण्याच्या सुचना गुन्हयाचे तपासिक अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.