खेडचे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस पी पोळ यांनी ही शिक्षा सुनावली. अजित कान्हूरकर असं आरोपीचं नाव आहे. मामाच्या मुलीवरील एकतर्फी प्रेमातून पुण्याच्या खेड तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली. 12 जून 2018 ला घडलेल्या हत्येचा तब्बल साडे सहा वर्षानंतर निकाल लागलाय. अजितचे मामाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते, त्यामुळं मामाचा अन मुलीचा ही लग्नास नकार होता. या रागातून मामाचं कुटुंब संपवायचं अजितने ठरवलं. याची सुरुवात मामाचा 18 वर्षीय मुलगा श्रीनाथ खेसे पासून त्याने केली. श्रीनाथ आणि मामाची लहान मुलगी एसटीतून खेडच्या दिशेने निघाले. त्यावेळी मागच्या सीट वर बसलेल्या अजितने धारदार शस्त्राने सपासप वार केले. अटकेनंतर ही अजित तुरुंगातून पत्राद्वारे मामाच्या मुलीला धमकावत होता, इतकंच नव्हे तर थेट न्यायाधीशांच्या समोर ही गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. हे पाहता आरोपी तुरुंगाबाहेर आला तर मामाच्या कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो. हे लक्षात घेता अजितला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या सुनावणीत सरकारी वकील म्हणून सागर कोठारी यांनी कामकाज पाहिलं.