(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांच्या आगामी चित्रपटाचा ‘द ताज स्टोरी’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्याने सोशल मीडियावर चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. या ट्रेलरमध्ये दाखवलेले संवाद, प्रश्न आणि दृश्ये प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडत आहेत.या चित्रपटात परेश रावल यांच्यासोबत अमृता खानविलकर, जाकिर हुसैन, स्नेहा वाघ आणि नमित दास हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.दिग्दर्शक तुषार अमरीश गोयल यांनी या सिनेमात इतिहास, श्रद्धा आणि राजकारण यामधील संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न केला आहे.सुमारे ३ मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये परेश रावल यांची जबरदस्त अभिनय शैली आणि त्यांनी विचारलेले धक्कादायक प्रश्न प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडत आहेत.
.हा चित्रपट येत्या ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, हाच दिवस भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आहे.या चित्रपटात परेश रावल यांनी ‘विष्णुदास’ नावाच्या गाइडची भूमिका साकारली आहे, जो ताजमहालाच्या इतिहासावर अनेक आश्चर्यकारक प्रश्न उपस्थित करतो.या चित्रपटातील अनेक डायलॉग व्हायरल होत आहेत. ट्रेलरमध्ये असे अनेक संवाद आणि प्रसंग आहेत, जे इतिहास आणि रहस्य यांचं मिश्रण प्रभावीपणे दाखवतात. त्याचा आणखी एक चर्चेचा डायलॉग म्हणजे,”ताजमहालच्या खाली ज्या २२ खोल्या आहेत, त्या कधी पाहिल्यात का? तिथं असं काय होतं, ज्या भिंतींत बंद करून टाकण्यात आलं?”
चित्रपटाचे पोस्टर समोर आल्यावर वादाला सुरुवात झाली. या पोस्टरमध्ये परेश रावल ताजमहालचा गुम्बज उचलताना दिसतात आणि त्यात भगवान शिवाची मूर्ती दिसते. हे दृश्य अनेकांना खटकले आणि सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
‘एक दीवाना की दीवानियत’ विरुद्ध ‘थामा’, दिवाळीत थेटर वॉर; PVR INOX वर पक्षपाताचा आरोप!
या वादानंतर चित्रपटाच्या टीमने आणि परेश रावल यांनी स्पष्ट केलं की या चित्रपटाचा उद्देश कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नाही.
चित्रपटाची कथा काही जुन्या वादग्रस्त दाव्यांवर आधारित आहे.चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शन अमरीश गोयल यांनी केलं आहे, कलाकारांमध्ये परेश रावल, जाकीर हुसेन, अमृता खानविलकर, नमित दास आणि स्नेहा वाघ यांचा समावेश आहे.३१ ऑक्टोबर २०२५ रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. आता पाहावं लागेल की हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात नवे प्रश्न निर्माण करतो की आणखी नवा वाद निर्माण करतो!