रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील काजूवाडी ते उसर फाटा हा मुरुडला जोडणारा मुख्य रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे. मोठमोठे खड्डे, साईड पट्ट्यांचा अभाव आणि झालेल्या अपघातांमुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) अलिबाग प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा कार्यकर्ते उमेश सावंत यांनी थेट PWD ला ७ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.”जर हा रस्ता वेळेत दुरुस्त झाला नाही, तर आम्ही PWD कार्यालयासमोर उपोषण करू असा सावंत यांचा इशारा आहे.