तीन दिवसांपूर्वी काश्मीर मध्ये पहलगाम येथे पर्यटनास गेलेल्या निष्पाप नागरिकांवर दहशतवाद्यानी अंदाधुंद गोळीबार केला यात 38 जणांचे प्राण गेले. या घटनेने पुरता देश हळहळला व गावावात या घटनेचा नागरिकांनी निषेध केला.मृतामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकाचा समावेश असल्याने महाराष्ट्रात सर्व स्थरातून या घटनेची निंदा करण्यात आली.खोपोलीत नागरिकांनी या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात निषेध रॅली काढली, रॅलीत पाकिस्तान विरोधात घोषणा देण्यात आल्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हल्ल्यातील निष्पाप मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.