रायगड जिल्हा परिषद आणि पाचाड ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 12 जानेवारी 2025 रोजी राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या 426 व्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन पाचाड येथील समाधीस्थळी करण्यात आले होते. आकर्षक फुलांची सजावट,रांगोळी आणि ढोलताशा लेझीम पथकामुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली होती. या कार्यक्रमास रोजगार हमी योजना, फलोत्पादन,खारभूमी विकास खात्याचे राज्याचे कॅबिनेट कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन,अभिषेक व महाआरती करण्यात आली. याप्रसंगी नामदार गोगावले यांच्यासमवेत पंचायत समिती महाड गटविकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील, पाचाड सरपंच सीमा बेंदुगडे, स्वराज्य संग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानाजीराव शिंदे, बाळ राऊळ, बंधू तरडे, सुरेश महाडिक, आदी मान्यवर उपस्थित होते.या जन्मोत्सव सोहळ्याला विविध शिवभक्त संघटनेचे सदस्य,शेकडो शिवभक्त आणि पाचाड ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर देत गोगावले यांनी जिजाऊ माँसाहेबांचा वाडा जुन्या पद्धतीने संवर्धन करण्याचा विश्वास व्यक्त केला.