सातारा जिल्ह्यात होणाऱ्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील पश्चिम भागातील पर्यटन स्थळावर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. यामुळे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी मार्गदर्शक सूचनेचा आदेश काढत पर्यटन स्थळांवर जाण्याबाबत काही सूचना केल्या आहेत. जोरदार पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढल आहे. अनेक पर्यटक धबधब्यांच्या शेजारी जाण्याचं धाडस करतात यामुळे अपघात होतात तसेच घाटमाथ्यावरून प्रवास करताना पर्यटकांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा सूचना देत हा आदेश काढण्यात आला पर्यटकांनी या ठिकाणी येताना आणि आल्यानंतर काय काळजी घ्यावी याबाबत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पर्यटकांना आवाहन केलं आहे. तसंच पर्यटनाला येताना मद्य बाळगण्यास मद्यपान करून येण्यास बंदी असून गाडीत मोठ्याने गाणी वाजवत ध्वनी प्रदूषण करण्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. यावेळी पर्यटकाचं स्वागत असल्याचं सुद्धा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी म्हटलं आहे.