मी माननीय बाळासाहेबांमुळे मोठा झालो. तेच माझे गुरु आणि सर्वस्व आहेत. ओरिजनल शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे. तुम्हाला ज्यात इंटरेस्ट आहे, त्यांची शिवसेना राहिलेली नाही. त्यांचे दुकान बंद झाले आहे. ते धडपडत असले तरी यांनी बाळासाहेबांची विचारधारा सांभाळली नाही. शिवसेना एकनाथ शिंदेकडे गेली आहे. यांचा कसला वर्धापन दिन. मी शिंदेचे अभिनंदन करतो शुभेच्छा देतो, असे वक्तव्य खासदार नारायण राणे यांनी केले आहे.