काश्मीरमधील पहलगाम येथे कुडाळमधील काही पर्यटक गेले होते. त्यांना तेथील कारचालकाकडून वाईट अनुभव आला होता. हल्ल्याच्या दोन दिवस आधी हा हल्ला होणार याची चाहूल त्या चालकाला होती की काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील प्रीती कदम यांच्यासह चार महिलांना अतिशय उद्धट वागणूक त्या चालकाकडून देण्यात आली होती. आतंकवादी पर्यटकांना गोळ्या मारतील, हल्ले करून मारून टाकतील तरी आपल्याला काही फरक पडणार नाही, असे वक्तव्य त्याने दोन दिवस आधी केलं होतं. असं वक्तव्य करणाऱ्या त्या चालकाला हल्ल्याची माहिती आधीच होती का? त्याचा शोध घेतल्यास बऱ्याच गोष्टी बाहेर येतील असा दावा प्रीती कदम यानी केला आहे.