कुडाळ नगरपंचायतमध्ये महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष बनलो याचे पूर्ण श्रेय आमचे नेते सतेज पाटील यांना आहे. मात्र, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष म्हणत आहेत की, आमची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. आमची कोणतीही हकालपट्टी पक्षातून झालेली नाही. आम्ही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय आधीच घेतला होता. आता जी २४ जानेवारी रोजी नगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली त्यामध्ये आमच्याकडे काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. आमचा उमेदवार जेव्हा पराभूत झाला त्यावेळी आम्हाला सहानुभूतीची गरज होती. पण ती त्यावेळी आम्हाला मिळाली नाही. आम्हाला मॉरल सपोर्ट मिळाला नाही. असं पक्षप्रवेशाबाबत किरण शिंदे यांनी सांगितलं आहे.