सोलापुरात राजकीय वादाचे पडसाद थेट गुन्हेगारी कृत्यात उमटताना दिसले. आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते शरणू हांडे यांचे अपहरण करून त्यांना ठार मारण्याचा कट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सोलापूर पोलिसांनी अवघ्या साडेचार तासांत तांत्रिक तपासाच्या आधारे कारवाई करत शरणू हांडे यांची सुटका केली, तसेच आरोपींना अटकही केली आहे. काल संध्याकाळी, आमदार रोहित पवार यांचा कार्यकर्ता अमित सुरवसे आणि काही तरुणांनी धारदार शस्त्राच्या धाकावर शरणू हांडे यांचे त्यांच्या घराजवळून अपहरण केले. प्राथमिक तपासात असे उघड झाले की, राजकीय वैमनस्यातून हे अपहरण घडवण्यात आले होते. अपहरणकर्त्यांचा शरणू हांडे यांना कर्नाटकात नेऊन ठार मारण्याचा कट होता. मात्र सोलापूर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग, आणि गुप्त माहितीच्या आधारे अवघ्या काही तासांत आरोपींचा छडा लावत शरणू हांडे यांची सुरक्षित सुटका केली.