शीख व्यक्ती अमेरिकेच्या भररस्त्यात करत होता तलवारबाजी; पोलिसांनी गोळ्या झाडल्या अन्..., Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Shik Man shot Dead By LAPD in America : वॉशिंग्टन : अमेरिकेच्या लॉस एंजेलिसमधून एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका शीख व्यक्तीला लॉस एंजेलिसच्या पोलिसांनी गोळी मारली आहे. गुरप्रीत सिंह (वय ३५) असे या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरप्रीत लॉस एंजेलिसच्या रस्त्यावर तलावर घेऊन उभा होता. तो तलवार हवेत फिरवत होता, यामुळे लोक घाबरले होते. लोकांनी घाबरुन ९११ वरुन पोलिसांना कॉल केला. घटनेची माहिती मिळताच लॉस एंजेलिसच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची नाराजी वाढली! डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचा आगामी दौरा केला रद्द?
प्रत्यक्षदर्शनींनी सांगितले की, गुरप्रीत आपल्या कारमधून आला. कार थांबवून त्याने रस्त्यावर उभे राहून लोकांना तलवार दाखवायला सुरु केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तलवार दोन फूट लांबीची होती. या तलवारीला खंडा म्हणतात. याचा वापर पारंपारिक भारतीय मार्शल आर्ट्समध्ये केला जातो. पण ही तलावर घेऊ गुरप्रीत सिंह लॉस. एंजेलिसच्या रस्त्यावर फिरत होता. यामुळे लोकांमध्ये घबराट निर्माण झाली होती.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच गुरप्रीतला तलवार खाली ठेवण्यास सांगितले. मात्र गुरप्रीतने त्यांचे ऐकले नाही. त्याने पोलिसांवर पाण्याची बाटली फेकून मारली. त्यानंतर तो गाडीत बसून तिथून निघून गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरप्रीत रॅश ड्रायव्हिंग करत होता. यावेळी त्याने पोलिसांच्या एका कारला जोरदार धडकही दिली. गुरप्रीत १२ स्ट्रीटवर जाऊन थांबला. गाडीतून उतरून त्याने तलवार घेऊन पोलिसांच्या दिशेने धाव घेतली.
यामुळे पोलिसांनी धोकादायक परिस्थिती पाहून गुरप्रीतवर गोळ्या झाडल्या. गुरप्रीत गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सध्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
The Los Angeles police shot a 36-year-old Sikh Gurpreet Singh for waving a sword on the road, resulting in his death.
Khalistanis must understand that America is not India’s Red Fort or Punjab where you can attack the police and remain safe.#LosAngelesCA #LAPD pic.twitter.com/yWRvh8kgmC
— U R B A N S E C R E T S 🤫 (@stiwari1510) August 29, 2025
या व्हिडिओ गुरप्रीत हवेत तलवार फिरवताना दिसत आहे. तसेच तो तलवारीने स्वतची जीभगी कापल्याचे दिसत आहे. यामुळे गुरप्रीत मानसिक दबावाखाली होती असे म्हटले जात आहे. पोलिसांनी सांगितले की, त्यांनी गुरप्रीतला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु तो ऐकण्यास तयार नव्हता. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. यामुळे त्यांना गोळीबार करावा लागला. घटनास्थळावरुन पोलिसांनी दोन फूट लांबीची तलवारही जप्त केली आहे.