संसदेच्या प्रवेशद्वारावर बसून चहा पिल्याच्या घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत तीव्र निषेध व्यक्त केला.आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांची खासदारकी रद्द करावी आणि त्यांना तुरुंगात टाकावे, अशी मागणी केली. या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी बोलताना भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी राहुल गांधी यांनी संसदेच्या प्रवेशद्वारावर बसून चहा पिण्याचा प्रकार हा संसदेचा आणि लोकशाही व्यवस्थेचा अपमान असल्याचा आरोप केला. तसेच अशा वर्तनाबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.