यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यासंदर्भातील इतिहासाबाबत चुकीची विधानं केली आहेत, तसेच छत्रपतींचा एकेरी उल्लेख करण्यात आला असल्याचा आरोप करत सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांनी निषेध नोंदवला आहे. आज ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आहे. राज्यभरात शिवप्रेमी आक्रमक झाल्यानंतर आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटाचं सेन्सॉर प्रमाणपत्र एक महिना निलंबित केलं आहे. या कालावधीत चित्रपटासंदर्भात चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय होईपर्यंत हे प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. ‘खालिद का शिवाजी’ हा चित्रपट आज (8 ऑगस्ट) थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु हे प्रदर्शन थांबवण्याची मागणी राज्य सरकारने केंद्रीय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे. आज मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाने निषेध नोंदवत हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मागणी केली आहे तसेच निर्मात्यावर गुन्हा दाखल करण्याचा यावा अशी ही मागणी करण्यात आली आहे. सेन्सर बोर्ड अशा चित्रपटांना परवानगी का देतो असाही सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. याप्रसंगी सकल मराठा समाजाचे रमेश आंब्रे तसेच सर्व पदाधिकारी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.