Maharashtra Assembly Election: तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीच्या बंडखोर उमेदवार ठाकचंद मुंगुसमारे यांनी आज महादेव मंदिरात पूजा करून आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला आहे. धुटेरा गावातील महादेवाचे आशीर्वाद घेऊन त्यांनी प्रचाराला प्रारंभ केला. प्रचाराच्या पहिल्याच भेटीत गावकऱ्यांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले. त्यांच्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य आणि संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.ठाकचंद मुंगुसमारे हे गरीब शेतकरी वर्गातून आलेले अपक्ष उमेदवार असून, जनसेवेसाठी आपले जीवन समर्पित करणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. जनतेच्या आग्रहास्तव त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रचाराच्या पहिल्या दिवशीच त्यांना जनतेचा जबरदस्त प्रतिसाद मिळाल्याने त्यांच्या प्रचार मोहिमेला चांगली सुरुवात झाली आहे.