पुणे विधान परिषदेच्या उमेदवारीवरुन अजित पवार राष्ट्रवादीत नाराजी उफाळून आलीये. आर्थिक दृष्ट्या ताकदवान आहे म्हणून विक्रम काकडेंना उमेदवारी दिली. असा घणाघाती आरोप दिवंगत अजित पवारांचे विश्वासू आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडेंनी केलाय. उमेदवारी डावलण्यात आल्यानंतर लांडेंनी पक्षाला अनेक उपरोधिक सल्ले ही दिलेत. आज अजित दादा असते तर त्यांनी पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी दिली असती. अशी खदखद लांडेंनी व्यक्त केली. अजित दादांच्या पश्चात आम्ही हतबल झालोय अशी खंत लांडेंनी व्यक्त केली. विक्रम काकडेंना संधी दिलीये म्हणजे भविष्यात पक्षाची ताकद नक्कीच वाढेल. असा उपरोधिक सल्ला ही लांडेंनी पक्षातील वरिष्ठांना दिला. विशेष म्हणजे आज विलास लांडे यांचा वाढदिवस आहे आणि आज त्यांना उमेदवारीच्या निमित्ताने बर्थडे गिफ्ट मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांचा अपेक्षा भंग झाला….