पुरावेही पोलिस तपासासाठी देण्यात आल्याची माहिती आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ४२ महामंडळांची अधिकृत भासणारी यादी पाठवून या टोळीने यवतमाळ जिल्ह्यात काही राजकीय लोकांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. सोबतच इच्छित महामंडळ निवडा आणि नियुक्ती निश्चित समजा, असा दावा करत आरोपींनी २०.२५ कोटी रुपयांचा डील करण्याचा प्रस्ताव भुतडा यांच्यासमोर ठेवला होता, अशी माहिती समोर आली आहे.
स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने संभाषण आणि पुरावे गोळा या संपूर्ण घटनाक्रमादरम्यान भुतडा है स्वतः राजकीय क्षेत्राशी आणि भाजप नेत्यांच्या संपर्कात राहत असल्याने त्यांना सुरुवातीपासूनच या व्यवहाराबाबत संशय होता. त्यामुळे त्यांनी सावध पवित्रा घेतला. त्यांनी स्पाय कॅमेऱ्याच्या सहाय्याने आरोपींचे संभाषण आणि हालचालींचे पुरावे गोळा केले. यानंतर शनिवारी फसवणुकीत सहभागी असलेल्या लोकांचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. अवधूतवाडी पोलिसांची मदत घेत सापळा रचण्यात आला. त्यानुसार या टोळीचा भंडाफोड करण्यात आला. राजकीय नियुक्त्यांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न उघडकीस आली.
अशी आहेत ‘त्या’ आरोपींची नावे
या कारवाईत पोलिसानी लौकिक जगन्नाथ फुलकर, विश्वजित सुरेश राठोड आणि गणेश लालसिंग राठौड या तिघांना अटक केली. भुतडा यांच्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले, पोलिस निरीक्षक नंदकुमार काळे आणि पथकाद्वारे या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
व्हॉट्सअॅपद्वारे साधला नेत्याशी संपर्क
प्रकरणाची सुरुवात १६ मे रोजी झाली. यात आरोपी लौकिक जगन्नाथ फुलकर याने व्हॉट्सअॅपद्वारे भाजप समन्वयक भुतडा यांच्यासोबत संपर्क साधला होता. यानंतर दिल्ली कनेक्शन दाखवून गणेश लालसिंग राठोड याला पुढे सेटिंगसाठी मुख्य सूत्रधार म्हणून समोर करण्यात आले. आरोपींनी भुतडा यांना विविध महामंडळांची यादी देऊन त्यात कोणतेही ३ महामंडळ निवडण्यास सांगितले होते. यात नियुक्तीच्या बदल्यात २०.२५ कोटींची मागणी करण्यात आली, व्यवहार पक्का करण्यासाठी एकूण रकमेपैकी ५ टक्के रक्कम टोकन म्हणून आगाऊ देण्याची अटही घालण्यात आली. थेट राजधानीतून नियुक्तीबाबत फोन येईल, असे आमिष दाखविण्यात आले.
Ans: केंद्र सरकारच्या महामंडळांवर अध्यक्ष किंवा सदस्यपद मिळवून देण्याचे आमिष दाखवत होते.
Ans: नितीन भुतडा यांनी संशय आल्याने स्पाय कॅमेऱ्याद्वारे पुरावे गोळा केले आणि पोलिसांच्या मदतीने सापळा रचला.
Ans: लौकिक फुलकर, विश्वजित राठोड आणि गणेश राठोड या तिघांना अटक करण्यात आली आहे.






