शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी अमरावतीत काँग्रेस आक्रमक झाली आहे. इर्विन चौकातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी इर्विन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले आहेत. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (फोटो सौजन्य – RNO)