प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी सक्तीचे करू नये पाचवीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही. देशातला एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो हे जरी खरे असलं तरी मुलांच्या एका विशिष्ट वयामध्ये तो किती भाषा आत्मसात करू शकेल याचा विचार सुद्धा करावा लागेल. यामुळे मातृभाषा बाजूला पडली तर याचा उपयोग होणार नाही यामुळे पाचवीच्या आधी हिंदीशक्ती करण्याचा हट्ट सरकारने सोडावा पाचवीच्या नंतर जर सरकारला हिंदी बाबत काही करायचं असेल तर त्याला आमचा विरोध नाही ठाकरे बंधू जे याबाबत बोलतायत ते चुकीचं नाही यानिमित्ताने महाराष्ट्रातले मराठी भाषिक एकत्र येत असतील आणि भूमिका घेत असतील तर ही चांगली गोष्ट आहे. एक कोणता पक्ष याबाबत निर्णय घेऊ शकत नाही सर्वपक्षीय नेते एकत्र यावेत असं राज ठाकरे म्हणाले असतील पण याबाबत अजून आम्हाला कोणी काही सांगितलं नाही मी त्याबाबत ऐकलं अन्य पक्षांना बोलवण्याबाबत त्यांचे स्टेटमेंट ऐकलं त्यांनी बोलवल्यानंतर यावर चर्चा करू आमचा अप्रोच निगेटिव्ह नाही.