आप खासदार राघव चढ्डा यांनी ब्लिकिंट डिलिव्हरी बॉय बननू होम डिलिव्हरी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे (फोटो - सोशल मीडिया)
सोशल मी़डियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये खासदार खासदार राघव चढ्ढा ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयच्या वेशात दिसत आहेत. त्यांनी डिलिव्हरी बॉय बननू गाडीवरून सामान पोहोचवताना दिसत आहेत. त्यांची ही स्टाईल सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नेटकऱ्यांना हा प्रश्न पडला आहे की एका खासदारावर अशी वेळ का आली आहे.लोकप्रिय आणि चर्चेत असलेले खासदार राघव चढ्डांना राजकारण सोडून हे Blinkit डिलिव्हरी बॉय का बनले असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
हे देखील वाचा : ‘औरंगजेबचा सोमनाथ मंदिराचे मस्जिद करण्याचा प्रयत्न’, स्वाभिमान पर्वात पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
खासदार राघव चढ्डांनी यांनी जाणून बुजून या अशा पद्धतीचा प्रयोग करुन पाहिला आहे. राघव चढ्ढा यांनी हे सर्व एका विशिष्ट उद्देशाने केले. खरं तर त्यांनी ब्लिंकिट डिलिव्हरी पार्टनरचा गणवेश परिधान करायचे, स्कूटर चालवायचे आणि डिलिव्हरी बॉयप्रमाणे लोकांना वस्तू पोहोचवायचे. यामागचा उद्देश ब्रँडचा प्रचार करणे नव्हता, तर डिलिव्हरी बॉय आणि गिग कामगारांच्या जीवनाची जवळून समज आणि ओळख करून देणे हा होता.
Video: AAP MP Raghav Chadha, lives a day in the life of a gig-worker, shares video on social media 📹: @raghav_chadha pic.twitter.com/2Bkj1pKxHa — NDTV (@ndtv) January 12, 2026
गिग इकॉनॉमीवरील प्रश्न
आप खासदाराचा हा व्हिडिओ त्यांनी देशाच्या गिग इकॉनॉमीचे “शोषणात्मक वास्तव” उघड करणाऱ्या एका पोस्टनंतर आला आहे. अलीकडेच, आप खासदाराने सरकारने जारी केलेल्या सामाजिक सुरक्षा नियमांच्या मसुद्याचे स्वागत केले. हे नियम ३० डिसेंबर २०२५ रोजी सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० अंतर्गत अधिसूचित करण्यात आले. चढ्ढा यांनी त्यांना “लाखो गिग कामगार आणि डिलिव्हरी भागीदारांना ओळख, संरक्षण आणि आदर देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पहिले पाऊल” म्हटले. ते म्हणाले की प्लॅटफॉर्म कंपन्यांनी हे आवाज ऐकले नसले तरी, देश आणि सरकारने नक्कीच ऐकले आहेत.
हे देखील वाचा : कोलकाताहून आय-पीएसीच्या गोवा कार्यालयात २० कोटी रुपये पोहोचले…; EDचे TMCवर गंभीर आरोप
संसदेच्या अधिवेशनानंतर, राघव चढ्ढा यांनी एका डिलिव्हरी पार्टनरला त्यांच्या निवासस्थानी जेवणासाठी आमंत्रित केले. ही बैठक अतिशय सहज आणि सौहार्दपूर्ण होती, ज्यामध्ये मोकळेपणाने चर्चा झाली. जेवणादरम्यान, डिलिव्हरी पार्टनरने त्यांचे वास्तविक जीवनातील अनुभव शेअर केले, त्यांनी कामाचे जास्त तास, अनिश्चित कमाई, अल्गोरिथम-आधारित लक्ष्यीकरण आणि मूलभूत सुरक्षितता किंवा तक्रार निवारण यंत्रणेचा अभाव यावर चर्चा केली. यंदाच्या अधिवेशनामध्ये आप खासदार राघव चढ्डांनी या बाबी सभागृहामध्ये निदर्शनास आणून दिल्या आहेत.






