(फोटो सौजन्य: X)
वाघ हा जंगलातील सर्वात धोकादायक आणि भयंकर शिकारी आहे. त्याच्या ताकदीमुळे त्याला जंगलाच्या राजाची उपमा देण्यात आली आहे. वाघाच्या शिकारीचे अनेक थरारक दृश्ये सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात आताही असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार धुमाकूळ घालत आहे. मात्र यात शिकारीचे एक अनोखे पण थरारक दृश्य दिसून आले. व्हिडिओत तब्बल 7 वाघ एका बगळ्यावर निशाणा साधताना दिसून आले. बगळ्याने शिकाऱ्यांच्या तावडीतून सुटण्याचा फार प्रयत्न केला मात्र 7 वाघांसमोर त्याचा काही निकाल लागला नाही आणि शेवटी नको तेच घडलं. शिकारीचे हे दृश्य इतके भयानक आहे की ते पाहून तुमच्या अंगावर काटा येऊ शकतो. चला यात काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मीडियावर शिकारीचे एक भयंकर दृश्य दिसून आले ज्यात तब्बल 7 एका बगळ्यावर तुटून पडल्याचे दिसले. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात बगळा आणि वाघांची टोळी आमने-सामने असल्याची स्पष्ट दिसून येते. जंगलाच्या राजांना पाहताच बगळा घाबरतो, आपली शिकार होणार आहे आणि यातून आपली सुटका होणे कठीण आहे हे त्याला समजते मात्र हिम्मत करून तो आपले पंख उंचावत तिथून पळून जाण्याच प्रयत्न करतो. पण दुर्दैवाने त्याचा हा प्रयत्न असफल होतो आणि वाघांची टोळी निर्दयपणे अवघ्या काही सेकंदातच त्याची शिकार करतात. शिकारीचे हे दृश्य आता सोशल मीडियावर चांगलेच शेअर केले जात आहे. लोक यातील दृश्ये पाहून बगळ्यासाठी हळहळ व्यक्त करत आहेत.
अहवालानुसार, ही घटना शेंडोंग प्रांतातील देझोऊ येथील क्वानचेंग युरोपार्क वाइल्डलाइफ किंगडम येथे घडली, जिथे एक राखाडी क्रेन चुकून वाघांच्या कुंपणात शिरला आणि त्याचा शिकार बनला. तथापि, पक्षी वाघांच्या कुंपणात कसा पोहोचला याची पुष्टी झालेली नाही. प्राणीसंग्रहालय प्रशासनाने सांगितले की क्रेन कुंपण वाघांच्या क्षेत्रापासून खूप दूर आहे. अशा परिस्थितीत, हे स्पष्ट नाही की हा राखाडी क्रेन उद्यानातील पाळीव प्राणी होता, आजूबाजूच्या परिसरातून आला होता की जंगली पक्षी होता, त्याची अद्याप चौकशी सुरू आहे.
A crane flew into a tiger enclosure in China… And instantly regretted its life choices.pic.twitter.com/0R8IhDilwr
— Massimo (@Rainmaker1973) June 10, 2025
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @Rainmaker1973 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 3 मिलियनहून अधिकचे व्युज मिळाले आहेत तर अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बगळ्याला तिथे जाण्याच पाश्च्याताप झाला असेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कल्पना करा की तुम्हाला उडता येत आहे आणि तरीही तुम्हाला खाल्ले जात आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.