(फोटो सौजन्य – Instagram)
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या लेफ्टनंट विनय नरवाल यांच्याबद्दल देशभरात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण त्यांच्या बलिदानाला श्रद्धांजली वाहत आहे. दरम्यान, एक व्हिडिओ व्हायरल प्रचंड व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक नवविवाहित जोडपे काश्मीरच्या सुंदर दऱ्याखोऱ्यांत हसत नाचत आनंद लुटताना दिसून आले. हा व्हिडिओ शहीद विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी यांचा आहे असा दावा यात करण्यात आला आहे. मात्र नुकतेच या व्हिडिओबाबत एक धक्कादायक सत्य समोर आले आहे.
खरं तर, सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ नौदल अधिकारी विनय नरवाल आणि त्यांच्या पत्नीचा असल्याचा दावा करण्यात आला आहोत मात्र प्रत्यक्षात हा व्हिडिओ याशिका शर्मा आणि आशिष सेहरावत यांचा असल्याचे उघड झाले आहे. त्यांनी स्वतः त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत याचा खुलासा केला आहे.
व्हिडिओमध्ये यशिका म्हणते की, “आम्ही जिवंत आहोत कारण आम्ही त्या हल्ल्यात नव्हतो. पण आमचा व्हिडिओ एका शहीद अधिकाऱ्याचा असल्याचा दावा करून तो कसा व्हायरल केला जात आहे हे आम्हाला माहित नाही. सर्वत्र मीडिया चॅनेलवर, आमचे फुटेज त्या दुःखद घटनेशी जोडले जात आहे.” तिने पुढे सांगितले की, या खोट्या बातमीमुळे त्यांना सोशल मीडियावर खूप द्वेषाचा सामना करावा लागला, तर त्यांचे कुटुंब आणि जवळचे लोकही यामुळे घाबरले आहेत. ते पूर्णपणे सुरक्षित आणि जिवंत असताना अनेक लोक त्याला ‘RIP’ लिहित होते.
हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी एक भावनिक कॅप्शन लिहिले आहे. यात लिहिले आहे की, “दुर्दैवाने या व्हिडिओचा अनेक पेज आणि न्यूज चॅनेल्सनी गैरवापर केला, हा विडिओ दिवंगत विनय सर आणि त्यांच्या पत्नीचा शेवटचा व्हिडिओ असल्याचा खोटा दावा केला जात आहे. त्यांच्या कुटुंबियांना आमच्या मनापासून संवेदना पण आमच्या व्हिडिओचा गैरवापर करणाऱ्या कोणत्याही पेजची तक्रार करा, कारण ते खरोखरच निराशाजनक आहे. प्रतिष्ठित न्यूज चॅनेल आणि पेज देखील व्ह्यूजसाठी अनव्हेरिफाइड कंटेंट वापरत आहेत हे पाहून धक्का बसतो, यामुळे बातम्यांच्या स्रोतांवर विश्वास ठेवणे कठीण होते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.